हवेली बाजार समितीत पक्षविरोधी भूमिका भोवली ! पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीतून हाकालपट्टी !!


पुणे :हवेली  कृषि उत्पन्न बाजार समिती ,पुणेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट यांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत आहेत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करून जिल्हाध्यक्ष या नात्याने दांगट यांनी हकालपट्टी करीत असल्याचे गारटकर यांनी सांगितले.

पक्षाची शिस्त सर्वांसाठी बंधनकारक आहे. पक्षविरोधी कारवायांबद्दल जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पीडीसीसी बँकचे संचालक विकास दांगट यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील जे पक्षविरोधी भूमिका घेऊन काम करतात.

विकास दांंगट हे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी चालू हवेली बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपसहीत राष्ट्रवादीच्या बंडखोर पदाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या पॅनेलचे ते स्वतः हा नेतृत्व करीत आहेत. तर त्यांचे बंधू हे नितीन दांगट हे उमेदवार आहेत. काही दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. आता त्यांच्यावर विरोधी कारवाई केली म्हणून हकलपट्टी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

 

त्यांना आवाहन करतो, की पक्षविरोधी कारवाया थांबवाव्यात, अन्यथा आपल्यावर देखील कारवाई करावी लागेल, असा इशारा गारटकर यांनी दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!