राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून नव्या वादाला तोंड ; सुनील तटकरेंनी शशीकांत शिंदेंना फटकारलं, स्पष्टच बोलले…

पुणे : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्यावरून वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

पुढे बोलताना तटकरे यांनी असं म्हटलं आहे की,शशीकांत शिंदे लेखामध्ये चुकीचं लिखाण केल आहे. असं लिखाण त्यांनी करू नये, जर असं लिखाण वारंवार होत असेल तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी उत्तर देईन, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.मी वारंवार या विषयावर स्पष्टपणे सांगितलंय की सुनेत्रा वहिनी आहेत. नेते मंडळी आहेत. ते चर्चा करू शकतात असे त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, अजितदादांनी कोणतीही इच्छा लपवून ठेवली नव्हती. सर्वांना काही सगळं सांगितलं होतं.आणि मुख्य म्हणजे अदृश्य हात आणि धमक्यांमुळे अजितदादांना बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला. या शब्दांना माझा आक्षेप आहे, असं म्हणत तटकरेंनी शशीकांत शिंदेंच्या लेखावर आक्षेप घेतला.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या वेळी निकालाला ब्रेक लागला असताना आता पुन्हा एकदा या विलीनकरणावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. आता राष्ट्रवादीचे विलीनकरण होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.