पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना ड्रग्ज दिलं ; राष्ट्रवादी नेत्याच्या आरोपाने राजकीय वादंग

पुणे : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्या होत्या. मात्र या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर त्यांनी निवडणुकीत घोळ झाला असल्याच म्हणत कार्यकर्त्यांना ड्रग्ज दिल्याचा आरोप केल्याने नव्या वादाला ठिणगी पडली आहे.

पंचायत समिती निवडणुकीतील पराभवानंतर कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडिया स्टार निर्मला नवले यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत.त्या म्हणाल्या,राजकारण खराब असून ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी निवडणुका लढवाव्यात, असं त्यांनी म्हटले आहे. पंचायत निवडणुकीत पैसा, बोगस मतदान आणि ड्रग्जचा वापर झाला असा गंभीर आरोप निर्मला नवले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
पुढे बोलताना त्या म्हणाल्या,निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरला, पण माझा लढा सुरूच राहील. या निवडणुकीत पैशाचा आणि ड्रग्जचाही वापर करण्यात आला. माझा हा 300मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आहे, पण ज्या 6577मतदारांनी विश्वास दाखवला, त्यांची मी मनापासून ऋणी आहे असे नवले यांनी म्हटलं.

या निवडणुकीच्या काळात माझ्याच गावातील 30ते 40 तरुण ड्रग्सच्या आहारी गेली. तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जात असं बर्बाद होताना पाहणं हे अत्यंत चिंताजनक आहे. आजच्या राजकारणात समस्या, आणि पक्ष निष्ठा वेशीला टांगण्यात आली आहे. आज कोणता उमेदवार जास्तीत जास्त पैसा वाटतो हेच निकष ठरले आहेत असा सणसणीत आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोप आणि राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे