’50 कोटींसाठी अजितदादांना मारलं का?’ अमोल मिटकरींचा खळबळजनक खुलासा


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.त्यांचा अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा आरोप सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील मोठा खुलासा केला. अजित पवारांना ५० कोटींसाठी मारलं का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानात बसले होते. ते विमान VSR कंपनीचे होते. ही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत असताना देखील त्यांना विमानात बसवण्यात आले. आता या विमान कंपनीबाबत अमोल मिटकरी यांनी धक्कादायक खुलासा केला.तें म्हणाले,ज्यात त्यांनी VSR कंपनीने डिसेंबर 2025 च्या महिन्यात आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा उतरवल्याची माहिती दिली होती.

या सगळ्या घटनाक्रमानंतर 50 कोटींच्या विम्याच्या पैशांसाठी हा अपघात घडवून आणला का? असा संशय अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे तसेच त्यांनी अपघाताच्या एक महिना आधी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख देखील केला आहे. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.

अजित दादांच्या विमान अपघाताची केंद्राने मोठ्या एजन्सी कडून चौकशी करावी.तसेच मी रोहीत पवार यांच्या मताशी सहमत आहे. आमचा सीआयडीवर विश्वास आहे, पण त्यांच्या तपासाला मर्यादा आहेत, असंही मिटकरांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!