अजितदादांचा विमान अपघात हा घातपात असू शकतो!! रोहित पवारांनी दिली सर्वांना हादरवणारी माहिती….


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत शंका उपस्थित होत आहेत. या सर्व शंका, संशयांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

अपघात ग्रस्त विमानाची तपासणी झाली होती का, त्याची दुरुस्ती कोणत्या कर्मचाऱ्यांनी केली होती, असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान ज्यावेळी विमानतळाच्या हद्दीत दाखल झाले, त्यावेळी त्याचा आवाज काहीसा वेगळाच येत होता. ८.४३ ते ८.४५ दरम्यान विमान अपघाताची घटना घडली.

तसेच ९ वाजता अपघाताची बातमी समोर आली, त्यावेळी आम्हाला दादा हॉस्पीटलमध्ये आहेत. जखमी आहेत, पण जिवंत आहेक, अशी आम्हाला आशा होती. पण ९.४५ ला दादांच्या निधनाची बातमी समोर आली. विमान १६ वर्षे जुने होते. अजितदादा त्यांचे घड्याळ कायम १५ मी पुढे ठेवायचे. यानंतर दादांच्या मुंबई प्रवासाची सर्व माहिती घेतली.

अजित पवार २८ जानेवारीला ज्या विमानातून आले, त्याच्या दोन दिवस आधी ते विमान कुठे कुठे प्रवास करून आले, त्याची माहिती घेतली. जे विमान अपघात ग्रस्त झाले. ते विमान दोन दिवसांपूर्वी सुरतचा प्रवास केला होता. त्या विमान कंपनीचा मालकाने सांगितले की, विमान सुस्थितीत आणि वेळोवेळी दुरुस्ती केली जात असल्याचे सांगितले होते. पण विमान अपघाताच्यावेळी बारामतीतील प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले की, रोजच्या प्रमाणे विमानाचा आवाज वेगळाच आला होता. म्हणजेच विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता होती.

विमानाच्या मालकाने माहिती दिल्यानंतरही अनेक प्रश्न पडतात, विमानात असे काय झाले असावे की विमान एका बाजुला कलले, तांत्रिक बिघाड झाला असावा का, टेकऑफपूर्वी विमानाची तपासणी करण्यात आली होती का? जे विमान ५१ हजार फूटांवरून उडत होते त्याची तपासणी करावीच लागते हा डीजीसीए’चा नियमच आहे. आता हे विमानाची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांशीच बोलावे लागणार आहे.

याशिवाय विमानाचा टेकलॉग होता का, विमान हवेत उडण्याच्या लायक होते का, याचा रिपोर्ट कुणी दिला होता,विमानाचा मेंटनन्स केला होता, का या सर्व गोष्टींचे रिपोर्ट पाहावे लागणार आहेत

विमानाचा रुटीन मेंटनन्स झाला होता का, विमानाच्या प्रत्येक प्रवासानंतर हा मेंटनंन्स कारावा लागतो या सगळ्यांचे आम्ही रिपोर्ट मागवले आहेत. गेल्या १३-१४ दिवसांत पक्त चर्चा सुरू आहेत. कोणताही तपास सुरू नाहीत, फक्त सीसीटिव्ही फुटेज समोर येत आहे. जर वेळेत हे रिपोर्ट समोर आले नाहीत.असाच टाईपास केला तर त्यातही छेडछाड केली जाऊ शकते.

या कंपनीचा इतिहास पाहिला असता, २०२३ मध्येही लेअरजेटचे विमान होते. पण बारामतीच्या विमानतळावर ILS सिस्टम नसल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण बारामतीच्या विमानतळावर ILS सिस्टम नसतानाही मोठमोठ्या उद्योजकांचीही विमाने यापूर्वी उतरली आहेत. त्यामुळे मुंबईच्या विमानतळावर उच्च दर्जाची ILS सिस्टम असतानाही २०२३ मध्ये हा अपघात कसा झाला. मग बारामतीत हवामान, किंवा दृष्यमानता या गोष्टी ढकलता येणार नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!