ब्रेकिंग! जिल्हा परिषदेचा निकाल लागताच मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीवारी; पक्षश्रेष्ठींशी महत्त्वाची चर्चा


दिल्ली : राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत जाऊन ते पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याचे नेमके कारण काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रि‍करणाची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिल्ली दौऱ्यात ते गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली.

या महत्त्वाच्या भेटीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय मुद्द्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीणीकरणाबाबत मित्र पक्षासोबत खलबत्त सुरू असल्याचही समोर आलं आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येतें. या संदर्भात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीने शानदार विजय मिळवला आहे. 12 पैकी 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता आली आहे. तसेच 125 पैकी 55 पंचायत समित्यांमध्येही भाजपने विजय मिळवला आहे.

अशातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने हा दौरा महत्वपूर्ण ठरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!