शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! PM किसानच्या हप्त्याचे ‘या’ दिवशी पैसे जमा होणार


मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रु आर्थिक मदत दिली जाते. या योजनेच्या 22 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.हा हप्ता 1 ते 3 मार्चदरम्यान किंवा 4 मार्चपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.

सरकारने पीएम-किसान योजनेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी काही महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. या बदलांनुसार, 22 वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी आणि शेतकरी आयडी या दोन गोष्टी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 22व्या हफ्त्याच्या आधी या गोष्टी करणे बंधनकारक आहे. मार्च पहिल्या आठवड्यात हा हप्ता मिळणार आहे.होळीच्या सणाआधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार हा हप्ता लवकर वितरित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर आता पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना कृषी मंत्रालयाने यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे.हा हप्ता होळीपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, यासाठी काही अटी पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

दरम्यान यासाठी केवळ ई-केवायसी पुरेशी नसून, शेतकऱ्यांची जमीन नोंद, आधार क्रमांक, बँक खाते आणि संपर्क माहिती अचूक असणेही तितकेच आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!