मोठी बातमी! लाडक्या बहिणींचा 1500 चा हप्ता बंद होणार? ई- केवायसी करताना आलेल्या मेसेजचा अर्थ काय?


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई -केवायसी करून देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. तर काही लाडक्या बहिणींना ई -केवायसी करण्याची संधी मिळाली नाही.आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी पोर्टल सुरू केले आहे. पण त्यातही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लाडक्या बहिणींना ई- केवायसी करताना ‘हा आधार क्रमांक EKYC दुरुस्तीच्या यादीत नाही’,असा स्पष्ट मेसेज पोर्टलवर दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना 1500 मिळणार नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या महिलांची ई केवायसी रखडली आहे, त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांनी आधीच ई -केवायसी केल्या आहेत किंवा त्यांनी चुकीची माहिती भरली आहे. त्यांना फक्त ई -केवायसी करावी लागणार आहे.

हा आधार क्रमांक ई- केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही असा मेसेज येत असेल तर तुमची ई- केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा त्यात कोणतीही दुरुस्ती नाही असा अर्थ त्याचा होतो. त्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करण्याचं कोणतही कारण नाही. ज्यांनी योग्य माहिती दिली आहे त्यांना पुन्हा ई केवायसी करण्याची गरज नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आल आहे.

दरम्यान याबाबत अधिक काही संभ्रम असेल तर माहितीसाठी अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 31 मार्च 2026 पर्यंत राज्यातील लाडक्या बहि‍णींना रखडलेली ई -केवायसी पूर्ण करता येणार आहे. लाडक्या बहिणीसाठी केवायसीसाठी ही शेवटची संधी असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!