झेडपी निवडणुकीत वातावरण तापलं! पैशावर किती मतदार घेता येतील…..;माजी मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल


धाराशिव : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाचा उत्साह सगळीकडे असतानाच धाराशिव मध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी चढाओढ सर्वच पक्षात लागली असताना मतदानादिवशी ‘पैशावर किती मतदार घेता येतील, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका,’ अशाप्रकारची वक्तव्य असलेली माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

धाराशिव जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. याठिकाणी माजी पालकमंत्री तानाजी सावंत, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. असे असतानाच आता माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या व्हायरल क्लिप ने राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये कोटी-दोन कोटी खर्च करण्यासही हरकत नसल्याचे स्पष्टपणे ऐकू येत असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पैशांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.या कथित ऑडिओ क्लिपमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

दरम्यान या सर्व प्रकारामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!