शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन जाहीर! एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच येणार समितीचा अहवाल, कृषीमंत्र्यांची घोषणा


पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफी बाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. शेतकरी कर्जमाफी बाबत सरकारचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या माहिती संकलनाचे काम सुरू आहे. त्यामुळे तीस जून पूर्वी कर्जमाफी जाहीर केली जाईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

पुढे बोलताना ते म्हणाले,शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे. आता याबाबतच्या माहिती संकलनाचे काम सुरू असून, एप्रिलपूर्वी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय होईल, असं कृषीमंत्री दत्तात्र्यय भरणे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे.या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत घेतला जाणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा हा महत्त्वपूर्ण आहे. या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या घोषणाकडे लागून असताना शेतकऱ्यांना आता कृषीमंत्र्यांनी मोठा दिलासा दिला आहे.अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.

सरकार दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊले उचलत आहे.शेतकरी कर्जमुक्तीबाबत अर्थसंकल्पात मर्यादित तरतूद होऊ शकते. मात्र, दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल,’असा विश्वास कृषिमंत्री भरणे यांनी व्यक्त केला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!