पुण्यातील त्या कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर सुरु होता धक्कादायक प्रकार! दोन महिला अन्.. रूममधलं दृश्य पाहून सगळेच चक्रावले…


पुणे : पुण्यातील उत्तमनगर परिसरात एका आलिशान कॉम्प्लेक्समधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा गुन्हे शाखेने थरारक छडा लावला आहे. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

सरस्वतीनगर येथील ‘योगीराज कॉम्प्लेक्स’मधील एका बंद खोलीत पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन पीडितांची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.

या व्यवसायाची मुख्य सूत्रधार गौरी विकास पवळे (वय ४५) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

योगीराज कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला.

दरम्यान, पोलिसांनी एका पंटरला ‘बनावट ग्राहक’ म्हणून त्या ठिकाणी पाठवले. ग्राहकाने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पथकाने रूमवर धाड टाकली. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथे दोन महिला आढळून आल्या, ज्यांना पैशांचे प्रलोभन दाखवून या नरकात ढकलण्यात आले होते.

या व्यवसायाची मुख्य सूत्रधार गौरी विकास पवळे (वय ४५) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी पवळे ही गरजू महिलांना हेरून त्यांच्याकडून हा अनैतिक व्यापार करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!