आचारसंहिता भंगाचा ठपका ; निवडणूक विभागाची पुण्यातील चार सहकारी संस्थांना नोटीस, कारवाई होणार?


पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी चार सहकारी संस्थांना निवडणूक विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.आता यासाठी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस मिळालेल्या संस्थांमध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी), पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती तालुका दूध संघ आणि बारामती खरेदी–विक्री संघ यांचा समावेश आहे. या संस्थांकडून आचारसंहिता लागू असताना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव विविध संस्थांना आणि बाजारांना देण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या.

निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घोषणा मतदारांवर प्रभाव टाकू शकतात, असा प्राथमिक निष्कर्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाने काढला आहे. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे मानत संबंधित संस्थांविरोधात अधिकृत कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे संकेत यातून दिसून येत आहे. दरम्यान आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याकारणाने या प्रकरणाची पुढील कारवाई तातडीने सुरू करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!