सामना जिंकूनही संघ हरणार? क्रिकेट जगतात मोठी खळबळ, एकाच वेळी ७३ नियम बदलले, जाणून घ्या नवे नियम…

मुंबई : क्रिकेट विश्वात मोठी उलथापालथ करणारा निर्णय मेरिलबोन क्रिकेट क्लबने जाहीर केला आहे. २०२२ नंतर प्रथमच क्रिकेटच्या नियमांमध्ये व्यापक सुधारणा करत तब्बल ७३ नियम बदलण्यात आले असून हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहेत.

कसोटी क्रिकेटपासून क्लब क्रिकेटपर्यंत या बदलांचा थेट परिणाम दिसून येणार असून खेळाची गती, न्यायनिवाडा आणि पारदर्शकता वाढवण्याचा उद्देश या सुधारण्यांमागे आहे. या बदलांमध्ये दिवसाचा शेवटचा ओव्हर, ‘डेड बॉल’ची व्याख्या, ओव्हरथ्रो, हिट विकेट, बॅट आणि बॉलचे मानक अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, कसोटी सामन्यांत दिवसाच्या अखेरीस खेळ थांबवण्याबाबत असलेला जुना नियम आता बदलण्यात आला आहे, ज्यामुळे खेळाची रोमांचकता टिकून राहणार आहेल आढावा घेणार आहे. पेन्शनधारकांबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

सेवानिवृत्तीची तारीख काहीही असली तरी सर्व पेन्शनधारकांना ‘सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (पेन्शन) रुल्स, २०२१’ आणि लागू नियमांनुसारच लाभ दिले जातील. ‘फायनान्स ॲक्ट २०२५’मुळे सध्याच्या पेन्शन नियमांना वैधानिक मान्यता देण्यात आली असून नागरी तसेच संरक्षण पेन्शनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आता कसोटी सामन्यात दिवसाचा शेवटचा ओव्हर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे बंधनकारक असेल. याआधी शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट पडल्यास उर्वरित चेंडू न खेळता खेळ थांबवला जात होता. मात्र, नव्या नियमानुसार विकेट पडली तरी उर्वरित चेंडू खेळले जातील.
यामुळे नव्या फलंदाजाला कठीण परिस्थिती टाळण्याची संधी मिळणार नाही आणि खेळ अधिक स्पर्धात्मक राहील, असे एमसीसीचे मत आहे. या निर्णयामुळे विशेषतः कसोटी क्रिकेटमधील शेवटच्या सत्रातील उत्कंठा अधिक वाढण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांसाठीही हा बदल अधिक थरारक अनुभव देणारा ठरणार आहे.
ओव्हरथ्रो आणि मिसफील्ड यातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. फील्डरने विकेटवर थ्रो करताना चेंडू पुढे गेला तरच तो ओव्हरथ्रो मानला जाईल; मात्र बाउंड्रीजवळ चेंडू अडवताना हातातून निसटला तर तो मिसफील्ड समजला जाईल. तसेच, ‘डेड बॉल’ घोषित करण्यासाठी आता चेंडू विकेटकीपर किंवा गोलंदाजाकडे असणे आवश्यक राहिलेले नाही. चेंडू मैदानात थांबला असेल किंवा धाव शक्य नसल्याचे अंपायरला वाटले, तर तो थेट डेड बॉल घोषित करू शकतो.
याशिवाय, लॅमिनेटेड बॅटला क्लब क्रिकेटमध्ये सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. दोन किंवा तीन तुकडे जोडून तयार केलेले हे बॅट पारंपरिक सिंगल-पीस बॅटपेक्षा स्वस्त असल्याने ओपन एज क्लब क्रिकेटमध्ये त्यांचा वापर करता येणार आहे. हिट विकेट नियमही अधिक स्पष्ट करण्यात आला असून शॉट खेळल्यानंतर तोल जात स्टंप्सवर पडल्यास फलंदाज आउट ठरेल, जरी चेंडू दूर गेला असला तरीही.
महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी बॉलचे तीन वेगवेगळे साइज निश्चित करण्यात आले आहेत. पुरुष क्रिकेटसाठी सध्याचा बॉल कायम राहणार असून, महिला व मोठ्या वयाच्या ज्युनियर खेळाडूंकरिता साइज-2, तर लहान वयाच्या ज्युनियर खेळाडूंकरिता साइज-3 बॉल वापरला जाणार आहे. वजन व आकार वेगळा असला तरी गुणवत्ता, सुरक्षितता आणि मजबुतीचे नियम सर्व बॉल्ससाठी समान राहणार आहेत.