पंतप्रधान मोदींवर लोकसभेत हल्ला होणार होता? भाजप खासदाराच्या आरोपामुळे खळबळ..

पुणे : संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन सध्या सुरू आहे. या लोकसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा सुरू आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काही महिला खासदार हल्ला करणार होत्या असा खळबळजनक आरोप भाजप खासदार सौमित्र खान यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संसदेत राष्ट्रपतींच्या अधिवेशनावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार होते. मात्र त्यापूर्वीच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सदनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनामध्ये काहीतरी अघटीत होण्याची भीती निर्माण झाली होती.ज्यामुळे पंतप्रधान मोदींना सदनात येऊ नका असे आपण सांगितल्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसच्या महिला खासदार हल्ला करणार होत्या असा खळबळजनक आरोप भाजप खासदार सौमित्र खान यांच्यासह इतर काही नेत्यांनी केला.तसेच विरोधकांचे राजकारणात काहीही अस्तित्व राहिलेले नाही, त्यामुळे ते मोदींना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ते डाव्या बाजूला बसतात, पण उजव्या बाजूला का येत होते, कारण ते मोदींवर हल्ला करणार होते. विरोधक जे करत आहेत, ते योग्य नाही असे खान म्हणाले.

दरम्यान अधिवेशनच्या पहिल्या दिवसापासूनच काँग्रेसचे राहुल गांधी आक्रमक झाले होते. माजी लष्कर प्रमुख यांच्या अप्रकाशित पुस्तकामधील काही मुद्दे राहुल गांधी यांनी सांगितले. चीनने कशाप्रकारे घुसखोरी केली आणि सरकारने या मुद्याकडे लक्ष दिले नसल्याचा राहुल गांधी यांनी आरोप केला. यावरून मोठा गदारोळ झाला.