पुणे हादरले! तरुणीसाठी दोन मित्रांमध्ये वाद, एकाने कोयता काढला अन् भरचौकात घडलं भयंकर…


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातून पुन्हा एकदा रक्ताचा खेळ समोर आला आहे. किरकोळ कारणावरून तरुणांवर होणारे जीवघेणे हल्ले थांबायचे नाव घेत नाहीत. ध

नकवडीतील गजबजलेल्या त्रिमूर्ती चौकात मंगळवारी रात्री एका तरुणावर मित्रानेच कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ ‘मैत्रिणीशी मोबाईलवर का बोलला?’ या एका संशयाने मित्राने तरुणावर हल्ला केला. यावेळी रक्ताने रस्ता माखला.

आदित्य सुनील कांबळे (वय २०, रा. नऱ्हे) आणि चेतन बाजीराव चव्हाण (वय २३, रा. धनकवडी) हे दोघेही चांगले मित्र होते. या दोघांचीही एकाच तरुणीशी मैत्री होती. मंगळवारी रात्री हे दोघे त्रिमूर्ती चौकात भेटले.

गप्पांच्या ओघात आदित्यने त्या तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधल्याचे चेतनला समजले. रागाच्या भरात असलेल्या चेतनने कशाचाही विचार न करता भरचौकात कोयता उपसून आदित्यवर हल्ला चढवला.

रात्रीची वेळ आणि लोकांची वर्दळ असतानाही आरोपी चेतनने आदित्यवर जीवघेणे वार केले. या हल्ल्यात २० वर्षांचा आदित्य गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. अवघ्या काही सेकंदात मित्राचे रूपांतर शत्रूत झाले आणि जुन्या मैत्रीचा शेवट रक्ताने झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!