पहिल्या पत्नीच्या हयातीत पतीचे दुसऱ्या महिलेशी लग्न ; सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्या पत्नीचा मानसिक छळ, पतीसह दहा जणांवर गुन्हा दाखल..

लोणी काळभोर : पहिल्या पत्नीशी वैवाहिक नाते कायदेशीररित्या अस्तित्वात असताना पतीने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर दुसऱ्या महिलेशी दूसरे लग्न करुन सहजीवन सुरू केले आहे. तसेच पतीने सोशल मीडिया माध्यमांवर दुसऱ्या महिलेला पत्नी म्हणून दर्शवून फोटो, स्टेटस व पोस्ट अपलोड करुन मानसिक छळ केल्याप्रकरणी पिडीत पत्नीने पतीसह दहा जनांवर फिर्याद दिल्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे दुसरी पत्नी जिल्हा परिषद निवडणूकीसाठी एका राष्ट्रीय पक्षाकडून उभी असून ती पत्नी असलेबाबत प्रचार करीत आहे.मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सिध्देश्वर नामदेव काळभोर (पती), पुनम बाबुराव गायकवाड ( दुसरी पत्नी), नवनाथ नामदेव काळभोर (दीर), स्नेहल नवनाथ काळभोर (जाऊ) सर्व रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे. तसेच पतीचे नातेवाईक निमला चौधरी (पतीची मावशी) रा. लोहगाव, पुणे, नंदा उत्तम बोत्रे (पतीची मावशी), उत्तम बोत्रे (मावशीचे पती), दत्तात्रय रंगनाथ भाडळे (पतीचे मामा), ऋषाली निलेश बोत्रे (मावस जाऊ) व प्रणाली स्वप्नील बोत्रे (मावस जाऊ) सर्व राहणार सालुमालु पारगाव, ता. दौंड जि. पुणे. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार,सन २०१९ ते जानेवारी २०१६ दरम्यान पती सिद्धेश्वर काळभोर याचेशी व पुनम गायकवाड हिने दरम्यानच्या कालावधीत २३ जून २०२० रोजी व त्यानंतर तिच्या मोबाईल वरुन माझे मोबाईल वरून अश्लील भाषेत व्हॉट्सअॅप मेसेज व टेक्स्ट मेसेज करुन विनयभग करण्याचे उददेशाने अश्लील स्वरुपाचे मेसेज पाठवले आहेत व त्याला पतीचा पाठींबा आहे.

दरम्यान या दहा जनांनी पिडीतेच्या पतीने दुसरे लग्न केल्यापासुन आजपर्यंत तिचा मानसिक छळ केला आहे. तसेच त्यांना तिच्या वैध विवाहाची पूर्ण माहिती असूनही त्यांनी पुनम गायकवाड यांचे सोबत एकत्र काढलेला फोटो व पुनम गायकवाड हिचे नावापुढे सिध्देश्वर काळभोर असे नाव लावत असल्याचे फोटो स्टेटसला ठेवला व अनेक ठिकाणी फ्लेक्स लावुन त्यास पाठिंबा दिल्याने तिची बदनामी झाली आहे.
गावामध्ये जिल्हा परिषद प्रचारदम्यान घरोघरी फिरुन पुनम गायकवाड हि पिडीतेच्या नव-याची पत्नी असले बाबत प्रचार करीत आहे व व्हॉट्सअॅप स्टेटला तसे ठेवत आहे. पिडीतेची दोन मुलेही मोबाईलवर व्हॉट्सअॅप स्टेट्स पहात असल्याने त्यांचेही अनावर गंभीर परिणाम होत असून नमुद इसमांनी तिचा मानसिक छळ केला आहे.
पिडिता नोकरीस असून तिने पतीसह आत्याच्या मुलांना दिलेल्या मोठ्या रकमेसह पतीने तिला कुठलेही पैसे व दागिने परत केले नाही. त्याबाबत त्यांना वारंवार मागणी केली असता पतीने पुनम गायकवाड हिचे सोबत मिळून तिची नोकरी जाईल असा कट करून तिच्या विरुध्द वारंवार तक्रारी अर्ज केल्याने पिडीतेने भरोसा सेल पुणे शहर पोलीस येथून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारी अर्ज लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे चौकशी कामी आल्यावर पतीने आत्महत्या करेन अशी धमकी दिल्याने तिने भावनिक होऊन सदरचा अर्ज दफ्तरी फाईल केला.
त्यानंतर पती सन २०१९ पासून पुनम गायकवाड हिचे सोबत राहू लागले. डिसेंबर २०१५ मध्ये पुनम गायकवाड हिला पतीने जिल्हा परिषद निवडणुकीकरीता उमेदवार म्हणून पत्नी या नात्याने उभा करावयाचे असल्याने पिडीतेने कोणतीही हरकत घेऊ नये म्हणून पती सिध्देश्वरच्या सांगण्यावरुन दिर नवनाथ काळभोर याने फोन करुन तिला त्याचे बायकोला तिकीट मिळणार आहे. तुम्ही कोणताही विरोध करु नका नाहीतर मी माझ्या भावासाठी जेलमध्येही जायला तयार आहे. अशी धमकी दिली.
तसेच तिने किरण ताई महिला विचार मंच या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पती व तिचे सोबत राहणारी पुनम गायकवाड यांचा कोणताही उल्लेख न करता मेसेज केला असता त्यांनी तो मेसेज आमचेसाठीच आहे. असे म्हणून तिचे विरुध्द वरीष्ठ कार्यालयात तिचे निलंबनाबाबत आंदोलन करणार असलेबाबत तक्रारी अर्ज केला. परंतु पतीस यांना पुनम गायकवाड यांना निवडणुकीकरिता उमेदवार करावयाचे असल्याने त्यांनी तिला पत्नी म्हणून सर्व नातेवाईकांच्या घरी जाऊन फोटो काढून फेसबुक ग्रुपला टाकण्यास सुरुवात केली.
तिचे पती यांचे सासरकडचे मावशी काका यांचे मुले व सुना हह्यांचे पैकी वृषाली निलेश बोत्रे हह्यांचे व्हॉट्सअँप स्टेटसला माझे पती यांनी पुनम गायकवाड हिचे स्टेट्स वर माय स्वीट फॅमिली असा स्टेट्स ठेवले व त्यास पतीची मावशी निमला चौधरी, नंदा उत्तम बोत्रे, दत्तात्रेय भाडळे, उत्तम बोत्रे, प्रणाली स्वप्नील बोत्रे हे फोटो मध्ये असल्या बाबतचे त्यांचे स्टेट्सला पाहिले.त्यामुळे मला मानसिक त्रास झाला आहे. यांमुळे पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.