लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडून दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस.


लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून दोन दुचाकीसह मोबाईल असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी राज बाळू घाडगे (वय २३, रा मांजरी बु पुणे) व किशोर संजू चाफे (वय २३, रा मुंढवा पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सविस्तर हकिकत अशी की,बुधवार (४ फेब्रुवारी) रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीत पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या संजय नर्सरी जवळ दोन इसम त्यांच्या कडील नंबर प्लेट नसलेल्या दोन दोन दुचाकी वरून संशयितरित्या जात असताना दिसले.घाडगे व चाफे यांना ताब्यात घेऊन अधिक सखोल तपास केला असता त्यांनी सदरच्या मोटर सायकल खराडी व लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्या असल्याची कबुली दिली.

तसेच त्यांच्या ताब्यातुन हिरो स्प्लेडर दुचाकी क्रमांक एमएच १३ बीजी ३२९१ व एमएच २७ बीडी ६१७१ तसेच एक मोबाईल हँडसेंट असा एकूण १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून लोणीकंद व खराडी पोलीस ठाण्याचे हद्दीतील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई साठी खराडी व लोणीकंद पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे, परिमंडळ ६ पुणे शहर सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, लोणी काळभोर विभाग पुणे शहर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पैठणे, पोलीस अंमलदार आण्णा माने, सुरज कुंभार,राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, प्रवीण दडस, प्रशांत सुतार, अशोक गिरी यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!