देशावर दुहेरी संकट! ‘या’ ३ दिवशी मोठा अलर्ट , थेट इशारा, तब्बल इतक्या राज्यांमध्ये…

पुणे : राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यात थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे.

थंडी, पाऊस आणि उकाडा असा तिन्ही ऋतू अनुभवता येत आहेत. राज्यात उकाडा वाढण्याचे संकेत आहेत. डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहिली. मात्र, 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पावसानंतर राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे.
महाराष्ट्रातही मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. थंडी जवळपास गायब झाली असून उकाडा वाढत असल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत दमट हवामान जाणवत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान खात्यानुसार केरळ किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुद्दुचेरी, रायलसीमा आणि माहे या भागांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर या पावसाचा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
उत्तर भारतात थंडीचा जोर कायम असून हरियाणातील हिस्सार येथे देशातील सर्वात कमी तापमान 4.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पावसासह बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.