महिलांनो कॅब बुक करताय? थांबा, पुण्यातील ही घटना वाचून बसेल धक्का, नेमकं घडलं काय?


पुणे : बाणेर भागात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या एका कारचालकाने ४२ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मोबाईल ॲपवरून कार बुक करणे एका महिलेसाठी अत्यंत भयानक अनुभव ठरला.

याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ४२ वर्षीय महिलेने रविवारी (१ फेब्रुवारी) सकाळी आपल्या प्रवासासाठी एका प्रसिद्ध ॲपवरून कार बुक केली होती. प्रवास पूर्ण झाल्यानंतर बाणेर परिसरात कार थांबली असता, भाड्याच्या रकमेवरून चालक आणि महिला यांच्यात किरकोळ वाद झाला.

मात्र, या वादाचे रूपांतर अत्यंत खालच्या थरातील कृत्यात झाले भाड्यावरून झालेल्या वादानंतर कारचालकाने महिलेशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने महिलेचा विनयभंग करत अश्लील कृत्य केलं.

या प्रकारामुळे महिला प्रचंड हादरली. पीडित महिलेनं आरडाओरडा करण्यापूर्वीच आरोपी कारचालक तिथून पसार झाला. या धक्कादायक प्रसंगानंतर महिलेनं तातडीने बाणेर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली.

दरम्यान, बाणेर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित कारचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ॲपवरील माहिती आणि कारच्या नंबरवरून चालकाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस हवालदार शिरसाठ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!