पुण्याच्या राजकारणात गुंडांची दहशत! 2 महिला नगरसेवक डायरेक्ट जेलमधून महापालिकेच्या सभेला येणार…


पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या महापालिकेच्या पहिल्या सभेसाठी आता कुख्यात गुंडांच्या नातेवाईक अर्थात 2 महिला नगरसवेक डायरेक्ट जेलमधून महापालिकेच्या सभेला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आयुष कोमकर हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या आणि महापालिकेची निवडणूक जिंकलेल्या पुण्यातील दोन महिला नगरसेवक आता महापालिकेच्या पहिल्या सभेसाठी जेलमधून बाहेर येणार आहेत.प्रभाग 23 मधून सोनाली आंदेकर यांच्यासह लक्ष्मी आंदेकर यांचा देखील विजय झाला. लक्ष्मी आंदेकर 174 मतांनी विजयी झाल्या. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींनीही तुरुंगातून निवडणूक लढवली होती.

महापालिका निवडणुकांसाठी आंदेकर आणि कोमकर टोळीसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रभाग क्रमांक 23 मधून गुंड बंडू आंदेकरी वहिणी लक्ष्मी आंदेकर, गुंड बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर, गुंड गजा मारणेची बायको जयश्री मारणे, दहशतीचं दुसरं नाव असलेला गुंड बापू नायर, गुंड दीपक मानकरचा मुलगा हर्षवर्धन मानकर या उमेदवारांनी निवडणूक लढवली. या सगळ्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली.

9 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. सर्वसाधारण सभेला हजर राहण्यासाठी पत्राचा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. नगरसचिवांकडून कारागृहाला पत्र पाठवले जाणार आहे. या दोघीही पुण्यातील कुख्यात गुंडाच्या नातेवाईक आहेत.त्यामुळे आता पुणे महापालिकेच्या पहिल्या सभेची जोरदार चर्चा रंगली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!