ब्रेकिंग! महसूल मंत्र्यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; ‘राज्यात लवकरच कर्जमाफ होणार..


पुणे :राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वर्षानुवर्ष शेतात कष्ट करणाऱ्या, कर्जाच्या उजाखाली दबलेल्या गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होईल अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

राज्य सरकार कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा कधी करणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असताना आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार असून, शेतकरी कर्जमाफीचा दिलेला शब्द निश्चितपणे पाळला जाईल, असा ठाम विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यामध्ये गरीब शेतकऱ्यांच्या निकषात नेमकी कोणते शेतकरी बसणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना वगळले जाणार तसेच शेतकऱ्यांची गरीब ठरवण्याचा मापदंड काय असणार? हे प्रश्न अद्याप अनुतरित आहेत.फक्त कर्जमाफीपुरते न थांबता, पुढील काळात शेतकऱ्यांना वारंवार कर्ज घ्यावं लागू नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

दरम्यान शेतकऱ्यांच्या गरिबीचे ठरवण्याचे निकष काय असणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे सरकारकडून याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होण्याची शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!