भयंकर! ७० वर्षीय नराधमाने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दिले, नंतर घरात बोलावून घेतले अन्…


बीड : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित चिमुकली ही केवळ ९ वर्षांची होती.

तर आरोपीचे नाव बाबुराव केरबा निरडे (वय.७०) असे आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, धारूर तालुक्यातील एका गावात शेतमजुरी करून उपजीविका करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. २८ जानेवारीला सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. शाळेत जाण्यापूर्वी ती रस्त्यात एक मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबली तेव्हा गावातल्याच ७० वर्षीय वृद्ध आरोपीने तिला चॉकलेट देतो असे आमिष दाखवले.

आरोपीने चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने तिला बाहेर सोडले. त्यानंतर ती शाळेत गेली होती. मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर चिमुलीच्या वर्तनात अचानक बदल झाल्याचे तिच्या आईला लक्षात आले.

चिमुकलीसोबत घडलेल्या सगळ्या प्रकरणाने ती अत्यंत शांत, घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती. आईने तिला विश्वासात घेतले आणि विचारणा केली. तेव्हा बालिकेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. यांनतर आईने तात्काळ दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी बाबुराव केरबा निरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत आरोपीला अंबाजोगाई येथून अटक केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!