आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीचे भाव घसरले, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर काय आहेत?


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून सोमवारी दिल्लीत चांदीचे भाव प्रतिकिलो 2.66 लाख रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

तर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1.48 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुलीसाठी केलेल्या विक्रीमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही मोठी घसरण झाली आहे. सोमवारी (2 फेब्रुवारी) सकाळच्या सत्रात स्पॉट गोल्डमध्ये 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली, तर चांदीच्या दरातही मोठी घट दिसून आली.

भारतात सोमवारी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,48,240 रुपये आणि चांदीचा दर 2,66,500 रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 1,47,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकात्यातही हाच कल असून तिथे सोन्याचा दर 1,47,780 रुपये आहे. देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 1,47,720 रुपये इतका आहे. दक्षिण भारतातील बाजारपेठांमध्ये मात्र सोन्याचे दर इतर शहरांच्या तुलनेत थोडे अधिक आहेत.

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 1,48,400 रुपयांवर पोहोचला असून हैदराबादमध्ये 1,48,210 रुपये आणि बंगळुरूमध्ये 1,48,090 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने सोने विकले जात आहे.

शहरानुसार सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)

मुंबई – 1,47,970 रुपये
दिल्ली – 1,47,720 रुपये
बंगळुरू – 1,48,090 रुपये
चेन्नई – 1,48,400 रुपये
हैदराबाद – 1,48,210 रुपये
कोलकाता – 1,47,780 रुपये

सोन्याप्रमाणेच चांदीच्या घसरणीचा कलही कायम आहे. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 3,49, 900 रुपयांपर्यंत घसरली. एका आठवड्यात किंमत 15 हजार रुपयांनी वाढली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!