अजित पवारांचा घात की अपघात? राष्ट्रवादीच्या आमदारांनी व्यक्त केला संशय, पारदर्शक चौकशीची मागणी..

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असतानाच आता राष्ट्रवादीच्या आमदारांनी संशय व्यक्त केला आहे.राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी अजितदादांचा घात की अपघात?असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अर्ध्या रात्री अजितदादांचा दौरा वेगळा असताना ऐनवेळी विमानाने जाण्याचा निर्णय कसा झाला?यासंदर्भात लवकरच आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेणार आहोत,असे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने सहा लोकांचा मृत्यू झाल्याचा म्हटलं होतं. मग पाच मृतदेह कसे समोर आलेत? विमान आणि विमान चालक यांचा इतिहास समोर असतानाही तेच विमान आणि तोच विमान चालक कसा देण्यात आला? असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, मा.अजित दादांच्या अचानक जाण्याने आम्ही बधिर झालो,कसे झाले का झाले काहीच कळत नाही.देवाने लाखोच्या पोशिंदा नव्हता न्यायचा आमच्या सारखे न्यायचे होते.अत्यंत अघटीत घडले.आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील,पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे. राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत.