सुनेत्रा पवारांच्या शपथविधी आधी सुप्रिया सुळे काटेवाडीत दाखल ; पहिली प्रतिक्रिया समोर……


पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी आधीच खासदार सुप्रिया सुळे या काटेवाडीमध्ये दाखल झाले आहेत. तेथे जाऊन त्यांनी अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. यावरून शरद पवारांच्या कुटुंबानं सुनेत्रा पवारांच्या शपथविधीकडे पाठ फिरवली असल्याचा दिसून येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आई आशाताई काहिशा खचून गेल्या आहेत. म्हणूनच मी आज वेळात वेळ काढून आशाकाकींंना भेटायला आले आहे.बाकी काही नाही. राहिला प्रश्न पार्थचा तर तो गोविंद बागेत त्याच्या आजी आजोबांना भेटायला आला होता. असा दावाही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

यापूर्वी शरद पवार यांनीही सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री होण्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर मौन सोडले आहे. यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेण्याच्या काही मिनिटे आधी सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी वर प्रतिक्रिया दिली आहे.

त्या स्पष्टपणे म्हणाल्या, मला याबाबत काहीच माहिती नाही. यामुळे शरद पवार यांच्याप्रमाणे सुप्रिया सुळे देखील याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. मला बजेट सेशनसाठी दिल्लीला जायचं आहे. बाकी शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही.असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!