मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग..


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे संपूर्ण राज्यात अजित दादांच्या जाण्यामुळे मोठी खळबळ उडाली होती असे असताना एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

अजित दादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून राष्ट्रवादीच्या गटनेते पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार यावर शिक्का मुहूर्त झाले आहे.

या घडामोडींना वेग आला होता, अखेर याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना याबाबत कोणती माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे पवार कुटुंबात नेमकं चाललय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे. अजित पवार यांच्याकडे असलेली खाती सुनेत्रा पवार यांना दिली जाणार की नाही याबाबत अजून प्रश्नाचिन्ह आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!