ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार घेणार मोठा निर्णय, ‘या’ पदाचा राजीनामा?

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पाच वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी त्या आपला राजीनामा राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. या निर्णयामुळे महायुतीच्या गोटात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांची आज दुपारीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेता म्हणून अधिकृत निवड केली जाणार आहे.


सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच उद्या संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.या अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार आहेत.
दरम्यान विधीमंडळात पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या निवडीनंतर सुनेत्रा पवार यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार असून, पक्षांतर्गत प्रक्रियेला वेग येणार आहे.
