ब्रेकिंग!लाडक्या बहिणींचा हप्ता पुन्हा रखडणार ; पडताळणीला कोणाचा विरोध, काय आहे कारण?

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाभार्थ्यांनी ई केवायसी करून देखील अनेक महिन्यापासून त्यांचा हप्ता जमा झालेला नाही. या सगळ्या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना कामाला लावले होते. परंतु आता अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणीच्या कामाला विरोध करण्यात आला आहे.त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता पुन्हा रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र अंगणवाडी सेविकांच्या विरोधामुळे हा आता पुन्हा लांबणीवर पडणार आहे.राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही भागात अंगणवाडी सेविकांना घरोघर फिरून पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र अंगणवाडी सेविका संघटनेकडून पडताळणीच्या कामाला विरोध केला आहे. यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासन व संघटनेतील तिढा निर्माण होऊन लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा प्रश्न मात्र रखडणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची सामाजिक कल्याण योजना असून, पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. आता मात्र लाभार्थी महिलांना लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र प्रक्रियेत त्रुटींमुळे व तांत्रिक कारणांमुळे केवायसी पूर्ण करू शकले नाही. हा गोंधळ दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना निवडले होते मात्र पडताळणीच्या त्यांच्या विरोधामुळे लाडक्या बहिणींना धक्का बसला आहे.
