पुण्यात धक्कादायक घटना! मॉर्निंग वॉकसाठी गेलेली ४३ वर्षीय महिला, २ तरुण जवळ आले अन्…


पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बाणेरसारख्या उच्चभ्रू परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ४३ वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

तक्रारदार महिला बाणेर परिसरात वास्तव्यास आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही महिला आपल्या मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी बाहेर पडली होती. बाणेर रस्त्यावरून जात असताना, एका दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यांनी मुद्दाम महिलेचा पाठलाग करत तिच्याशी लज्जास्पद आणि अश्लील कृत्य केलं.

दरम्यान, या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला हादरून गेली. कृत्य केल्यानंतर आरोपींनी दुचाकीचा वेग वाढवला आणि तेथून पळ काढला. पीडित महिलेने याप्रकरणी तातडीने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या कलमान्वये दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाणेर पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!