ब्रेकिंग! सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी ‘होकार’, आणखीन एक मोठी जबाबदारी, मुंबईला रवाना….


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार कळवला. त्यानंतर त्यांचं कुटुंब देखील तातडीने मुंबईला रवाना झाल,आहे. उपमुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांच्यावर आणखीन एक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या अपघातात निधन झालं .त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पद रिक्त झालं. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी पाच वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार,पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर देखील राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्या अजित पवारांप्रमाणे दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत.

दरम्यान सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनणार असल्याबाबत आपल्याला काहीच माहित नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. हा निर्णय मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अंतर्गत चर्चा करून घेतला असावा. तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय असेल. याबाबत माझ्याशी चर्चा झाली नाही. असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!