अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने पुण्यात प्रचार थांबवला ; ना प्रचार सभा,ना रोड शो…

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीमध्ये,शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार थांबवला आहे. ना प्रचार सभा ना रोड शो असा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त पत्रकं वाटली जाणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करणार नाही अशी माहिती दिली आहे.राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाहीत. मतदारांना फक्त पत्रके वाटून प्रचार करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असं आदेश पक्षाकडून दिले आहेत. निवडून आल्यांनतर देखील कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कुणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवून त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी केली. याला आता भाजपकडून होकार मिळाला आहे.
