ब्रेकिंग! महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारच ; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होकार..?

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होणार आहे. त्याच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राजकीय जागेवर आता पवार कुटुंबातील वारसांची वर्णी लागणार आहे.त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सविस्तर चर्चा झाली आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्देवी अंत झाला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद द्याव अशी मागणी केली. त्यानंतर राजकीय गोठात हालचाली वाढल्या. भाजपच्या वरिष्ठांकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला होकार देण्यात आला आहे. दादांनंतर सुनेत्रा पवारांच्या हातात राष्ट्रवादीची सूत्र जाण्याची शक्यता समोर आली आहे.
दरम्यान अजित पवार यांच्याकडे असलेले खाती राष्ट्रवादीलाच मिळावी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून पत्रव्यवहार केला जाणार आहे. इतर पक्षातील मंत्र्यांकडे ही खाती जाऊ नये याची काळजी पक्षपातळीवर घेतली जाणार आहे. अजित पवार यांच्याकडे असलेल्या सर्वात महत्वांच्या खात्यांमध्ये अर्थ खाते हे सगळ्यात महत्त्वाचे खाते होतं.यासाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याच्या नावाचा प्रस्ताव दिला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

अजितदादांनंतर राष्ट्रवादीचं काय होणार? राष्ट्रवादीची सूत्र कोणाच्या हातात जाणार असे असंख्य प्रश्न आता उपस्थित केले जात होते. मात्र आता राष्ट्रवादीची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यासाठी भाजपकडून सिग्नल मिळाला आहे.
