अजित पवारांच्या एक्झिटनंतर 70 तासात हालचालींना वेग! मध्यरात्री खलबत, पक्षाची धुरा कुणाकडे जाणार?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ 70 तासांतच राजकीय हालचालींना वेग आला आहे.आता उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार? अर्थसंकल्प कोण मांडणार? राष्ट्रवादी पक्षाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार असे एक नाही तर अनेक प्रश्न सध्या समोर आहेत. या पार्श्वभूमीवरच आता काल रात्री वर्षा बंगल्यावर हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर केवळ 70 तासात काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची वारे वाहू लागले. काल रात्री वर्षा बंगल्यावर हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळास स्थान देऊन त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवाव अशी विनंती केली.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. अजित पवारांच्या अनुपस्थित त्या पक्षाचा चेहरा होऊ शकतात असा विश्वास हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी सहानुभूती आहे.तसेच पवार कुटुंबातील सदस्यांकडे नेतृत्व असल्यास पक्ष एकसंध राहण्यास मदत होईल अस मत पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जोर धरला आहे.

पक्ष संघटनेवर पकड मजबूत करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवण्याचा हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पटेलासारखा अनुभवी चेहरा दिल्ली आणि राज्यातील राजकारण सांभाळण्यासाठी योग्य ठरेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेले उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ खाते कुणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार आणि अजित पवार गट पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र त्याबाबत काय निर्णय होतो ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
