‘अजून विश्वास बसत नाही’…; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या ‘तीन व्हाट्सअप स्टेटसची चर्चा,दादांच्या आठवणीनं व्याकूळ


पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबांसह राष्ट्रवादींच्या समर्थकांवर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या भगिनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांची अवस्था बिकट झाली असून त्यांनीं पहाटे ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस समोर आले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या पहिल्या स्टेटसमध्ये अजित पवारांची ३५ वर्षे जुनी आठवण शेअर केली आहे.सुप्रिया सुळेंनी डिजिटल स्क्रीनवर अजित पवार यांचा फोटो आणि त्यांच्याशी संबंधित माहिती झळकत असलेला हा फोटो स्टेटसला ठेवला असून, त्यावर फक्त एकच शब्द लिहिला आहे “Heartbreaking

दुसऱ्या स्टेटसमध्ये हाच फोटो सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या अँगलमध्ये शेअर केला आहे. अजूनही यावर विश्वास बसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

तर सकाळी पहाटे सात वाजता त्यांनी तिसरं स्टेटस ठेवलं असून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही वेळ आमच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण आहे.

अवघ्या महाराष्ट्राच्या दिलदार व्यक्तिमत्वाला म्हणजेच अजित पवारांवर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी राज्यभरातील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!