लाडक्या ‘दादां’च्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचा आक्रोश काळीज पिळवटणारा, सर्व काही उद्धवस्त, व्हॉट्सॲप स्टेट्‍स समोर…


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळील भीषण विमान अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या घटनेने पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्याचवेळी लाडक्या भावाच्या मृत्यूनंतर खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स समोर आले आहे.

लाडक्या दादाचं विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. सकाळी त्यांचा व्हॉट्सॲप स्टेट्‍सवर Devasted ‘उद्धवस्त’ असे लिहिलेले होते. एकाच शब्दात आपलं किती नुकसान झालं, पवार कुटुंबियांचं, राष्ट्रवादी पक्षाचं किती नुकसान झालं याचा संदेशच त्यांनी दिला आहे. या घटनेने बारामतीतच नाही दर देशात खळबळ उडाली आहे.

पवार कुटुंबात शरद पवार यांच्या नंतर अजित पवार हे एक मोठा आधारवड होते. त्यांच्या अशा अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला. तसा पवार कुटुंबियांनाही बसला. सुप्रिया सुळे या अजितदादांच्या सोबतच राजकारणात वावरल्या. अजित पवार हे त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत. आपला हक्काचा दादा असा अचानक सोडून गेल्याने एका शब्दात त्यांनी त्यांच्यावर, कुटुंबावर, पक्षावर, कार्यकर्त्यांवर काळाने काय घाला घातला हे व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचा मोठा धक्का पवार कुटुंबियांना बसला आहे. सुप्रिया सुळे यांना देखील अश्रू अनावर झाले. सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार दुपारी अडीच वाजता बारामती रुग्णालयात पोहचले. यावेळी त्यांचा आक्रोश काळीज पीळवटणारा होता.

दरम्यान महाराष्ट्रात 28 ते 30 जानेवारी 2026 या तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अख्खा महाराष्ट्र बारामतीत उद्या उतरणार आहे. आपल्या लाडक्या नेत्याला उद्या अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वजण बारामतीला रवाना झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!