अख्खा महाराष्ट्र ‘दादा’ला अखेरचा निरोप देणार! उद्या सकाळी 11 वाजता बारामतीत अजित पवारांवर अंत्यसंस्कार..


बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.उद्या (२९ जानेवारी २०२६) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उद्या बारामतीत जनसागर लोटणार आहे. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खा महाराष्ट्र बारामतीत उतरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहणार आहेत.अजित पवार यांचे केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत होते. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले असून, उद्या ते स्वतः बारामतीत येऊन पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत देशातील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि ‘नो फ्लाय झोन’ लागू करण्यात आला आहे.आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते आणि नागरिक बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, शहरात अत्यंत शोकाकुल वातावरण आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!