महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दिलदार ‘व्यक्तिमत्व ; सहकारातून सुरुवात ते उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम ; अजित पवारांची राजकीय कारकीर्द..

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे एक प्रभावी आणि निर्णायक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सहकार क्षेत्रातून सुरुवात करून त्यांनी उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि सत्ता केंद्रात महत्त्वाची भूमिका निभावली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची राजकीय कारकीर्द –
महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक नेतृत्व, स्पष्ट भूमिका आणि निर्णायक निर्णयांसाठी ओळखले जाणारे नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेतले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाचा चेहरा असलेल्या अजित पवारांची राजकीय कारकीर्द ही संघर्ष, सत्ता, बंडखोरी आणि पुनरागमन अशा अनेक टप्प्यांतून गेलेली आहे.

अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1159 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे आहेत. मात्र, केवळ पवार कुटुंबातील सदस्य म्हणून नव्हे, तर स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करणारे नेते म्हणून अजित पवार ओळखले जातात.
अजित पवार यांनी सहकारी क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. 1982 मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले की त्यांची राजकीय कारकीर्दीची पहिली सुरुवात होती.त्यानंतर त्यांनी 1991 साली बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवून विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून बारामती हा त्यांचा अभेद्य बालेकिल्ला ठरला आहे होता. 2004 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते म्हणून म्हणून त्यांनी ठसा उमटवला.
2010 ते 2014 या काळात ते उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अनेक अनेक वेळा शपथ घेतली. 2010 ते 2014 या काळात ते उपमुख्यमंत्री होते. हा एक विक्रम मानला जातो.
अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द लक्षवेधी राहिली. सलग अनेक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. सिंचन, जलसंपदा, अर्थ आणि नियोजन यांसारख्या खात्यांमध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेतले. काही निर्णयांवरून ते वादातही सापडले, मात्र प्रशासकीय पकड असलेला नेता म्हणून त्यांची प्रतिमा कायम राहिली.
2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा वेगळा निर्णय घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळा गट स्थापन केला आणि भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाले. या वेळी ते पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. अजित पवार हे महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील अत्यंत प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जात होते.
