उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत काय घडलं?विमान 100 फुटावरून खाली कोसळलं,वाचवायला गेलो पण…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर थरार!


पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार प्रत्यक्ष दर्शनी सांगितला आहे. विमान 100 फूट खाली येत असतानाचं ते कोसळणार असं वाटलं होतं आणि क्षणार्धात तेच झालं…. डोळ्या देखत विमानाचा भयंकर स्फोट झाला असं प्रत्यक्ष दर्शनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्ष दर्शनींनीसांगितलं कि,अजित पवारांचा अपघात मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हे खूप दुःखदायक आहे. जेव्हा विमान खाली उतरत होतं, तेव्हा मोठा स्फोट झाला. त्यानंतर आम्ही धावतच आलो आणि पाहिले की विमानाला आग लागली होती. अखेरच्या 10 मिनिटात विमानात पुन्हा चार ते पाच स्फोट झाले, असं त्यांनी आहे.

विमानाला लागलेली आग इतकी रुद्र होती की, स्थानिक लोक आणि प्रत्यक्षदर्शी देखील हतबल झाले होते. कोणालाही विमानाच्या जवळ जाणे शक्य झालं नाही. त्यातच आम्हाला कळले की, या विमानात खुद्द अजित दादा हे सांगतानाही आम्हाला शब्द सुचत नव्हते,आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे. मी हे शब्दांत वर्णन करू शकत नाही, असं प्रत्यक्षदर्शीने म्हटलं आहे.

दरम्यान या विमान अपघातप्रकरणी प्राथमिक माहिती समोर आली असून विमानात तांत्रिक बिघाड होता, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लँडिंगदरम्यान पायलटने विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वेळी विमानावरील नियंत्रण सुटल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!