ब्रेकिंग! पुण्याच्या महापौर निवडीचा मुहूर्त लांबणीवर;’ या ‘तारखेला निश्चित होणार….


पुणे : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाची आरक्षण सोडत होऊनही पुणे महापालिकेच्या महापौर निवडीला विलंब होताना दिसत आहे. यासाठी भाजप पुन्हा धक्कातंत्र देणार की चर्चेतल्या नावाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. अशातच आता पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवड लांबणीवर पडली आहे.पुण्याचा नवा महापौर 11 फेब्रुवारी रोजी निश्चित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांची महत्त्वाची बैठक होत असून गटनेत्याची निवड आजच केली जाणार आहे. मात्र महापौर निवडीसाठी अजून वेळ लागणार आहे. महापौर पदासाठी रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, ऐश्वर्या पठारे, रत्नमाला सातव आणि मंजुषा नागपुरे यांची नावे चर्चेत आहेत. आता महापौर पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुणे महापालिकेवर 165 जागांपैकी 119 भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचाच महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे स्पष्ट आहे. महापौर आणि उपमहापौर पदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुण्यातील महापालिका निवडणूकासाठी महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आल आहे.त्यामुळे पुण्यात यंदा महिलाराज असणार आहे. मात्र महापौर निवडीला होणाऱ्या विलंबामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!