लाडक्या बहिणींना दिलासा ; बंद झालेला 1500 रुपयेचा हप्ता पुन्हा सुरू होणार? कॅबिनेट मंत्र्यांची मोठी घोषणा..

पुणे: मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी सरकारने ई -केवायसी बंधनकारक केली होती.ई-केवायसी न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये होत्या. आता राज्य सरकारकडून ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीमधील कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना ई -केवायसीसाठी मुदतवाढ होणार असल्याचे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ई -केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारकडून मिळणारा योजनेचा 1500 रुपयेचा हप्ता बंद झाल्याने धुळे, हिंगोली अन् भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आता सरकारकडून लाडक्या बहिणींना मुदतवाढ देण्याबाबत विचार करण्यात येत आहे.


या योजनेतील अपात्र महिलांना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंत ईकेवायसीची मुदत दिली होती. पण मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांना ई केवायसी करता आली नाही, अथवा त्यामध्ये चूका झाल्या. त्यामुळे अनेक महिलांचा प्रति महिना 1500 रूपयांचा लाभ बंद झाला. राज्यभरातून यामुळे लाडक्या बहिणींच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
दरम्यान लाडक्या बहिणींच्या संतप्त प्रतिक्रियानंतर मंत्री नरहळी झिरवाळ यांनी मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. लवकरच यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे.
