महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी, काय आहे कारण?


मुंबई: महापालिका निकालानंतर महायुतीमध्ये मुंबई आणि काही ठिकाणच्या महापौरपदावरुन तणाव आहे.अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या असताना आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

राज्यातील महापालिका निवडणुकीचा निकालानंतर राज्यमंत्री मंडळाची आज दुसरी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. त्यांच्या अनुपस्थिती मागचे कारण समोर आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जावळी येथे जाहीर प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार सभांना संबोधित करण्यासाठी शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीऐवजी पक्षाच्या प्रचाराला प्राधान्य दिले आहे.

दरम्यान महापालिकांमधील यशानंतर आता महायुती आणि विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्यामुळे जावळी येथील सभेतून एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात आणि विरोधकांवर काय टीका करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!