व्हॉट्सॲप युजर्सना फटका!आता चॅटिंगसाठी पैसे द्यावे लागणार? ‘सबस्क्रिप्शन प्लॅन’ची तयारी सुरु..

पुणे : भारतासह जगात कोट्यवधी युजर्स व्हाट्सअपच्या मोफत मेसेजिंग सेवेचा लाभ घेत असतात. आता या सेवेसाठी युजर्स ना पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मेटा कंपनीकडून व्हॉट्सॲपसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन आणण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे युजर्स मध्ये खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला मेटा कंपनीकडून सुरु असलेला हा प्लॅन व्हॉट्सॲप बिझनेस युजर्ससाठी लागू होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे संकेत मिळत आहेत.हा बदल प्रामुख्याने व्हॉट्सॲप बिझनेस युजर्सना डोळ्यासमोर ठेवून केला जात आहे. यामध्ये व्यवसायांना अधिक उपकरणे जोडणे आणि प्रगत मॅनेजमेंट टूल्स वापरण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे.
सामान्य युजर्ससाठी मूलभूत सेवा मोफत राहण्याची शक्यता असली, तरी जाहिरातीमुक्त अनुभवासाठी भविष्यात सर्वांनाच खिशाला कात्री लावावी लागण्याची चिन्हे आहेत. पेड सेवेबाबत मेटाकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नाही. पण व्हॉट्सॲपच्या या संभाव्य धोरणामुळे जगभरातील करोडो युजर्सचे लक्ष याकडे लागले आहे.

दरम्यान भविष्यात प्रत्येक व्हॉट्सॲपच्या युजर्ससाठी पैसे मोजावेच लागू शकतात. सोशल मीडियावर मेटा कंपनीच्या व्हॉट्सॲप सबस्क्रिप्शन मॉडेलची तशी चर्चा सुरू आहे. युजर्सना पैसे मोजावे लागले तर त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
