महापौरांसोबत मुंबई महापालिकेला मिळणार नवे आयुक्त; गगराणी यांच्यानंतर कोणावर धुरा?


मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर बहुचर्चित अशा मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार यासाठी राजकीय घडामोडी सुरु आहेत. आता महापौरासोबतच मुंबईला नवे आयुक्त मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.दोन महिन्यानंतर सध्याचे आयु्क्त भूषण गगरानी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कोण विराजमान होणार यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

1990 च्या बॅचचे सनदी अधिकारी भूषण गगरानी हे मार्च 2024 पासून मुंबईचे आयुक्त आहेत. महापालिकेवर प्रशासन म्हणून भूषण गगरानी यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. ते मार्च 2026 मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मिलिंद म्हैसकर हे मुंबईचे नवे आयुक्त होणार अशी चर्चा मंत्रालयाच्या वर्तुळात सुरु आहे.

मिलिंद यांच्या पत्नी मनीषा म्हैसकर याही आयएएस अधिकारी आहेत. त्यांचेही नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी चर्चेत आहे. सध्या त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

1992च्या बैचचे अधिकारी असलेले मिलिंद म्हैसकर हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी-टेक केले आहे. ते सध्या महाराष्ट्र सरकारचे एडीशनल चीफ सेक्रेटरी , रेवेन्यू एंड फॉरेंस्टची जबाबदारी सांभाळत आहेत.मिलिंद म्हैसकर हे नोव्हेंबर 2028 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. बीएमसीच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली तर त्यांना मोठा कार्यकाळ मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!