प्रवाशांचे हाल! मुंबईहून सुटलेली सोलापूरची ‘सिद्धेश्वरच एक्सप्रेस ‘रात्रभर यवतमध्येच थांबली; संतप्त प्रवाशांकडून प्रशासनाचा निषेध..


पुणे : सोलापूरची प्रसिद्ध सिद्धेश्वर एक्सप्रेस काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 10 वाजून 40 वाजता वेळाने धावली. ही गाडी तब्बल चार तास उशिराने म्हणजे रात्री अडीच वाजता मुंबईहून रवाना झाली. मात्र उशिरा रवाना झालेले ही गाडी दौंड तालुक्यातील यवत स्थानकात दुपारी बारा वाजून 40 वाजेपर्यंत पोहोचली. मात्र तरीदेखील ती गाडी तशीच थांबून होती.

मुंबईवरून सोलापूरची सिद्धेश्वर एक्सप्रेस सुटल्यानंतरही यवतमध्ये जास्त वेळ थांबून असल्याने चिडलेलें प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरले आणि काही प्रवाशांनी थेट रेल्वे रुळावर उतरून रेल्वे प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. रेल्वेच्या या अनियमित आणि विलंब होणाऱ्या वेळापत्रकाचा प्रवाशांनी निषेध केला. प्रवाशांना वेळेवर सेवा द्या,’प्रवाशांच्या जीवाशी खेळ थांबवा ‘अशा घोषणा देत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा त्यांनी निषेध केला.

सकाळी साडेसहा वाजता सोलापूरला पोहोचणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस सायंकाळी पाच वाजता पोहोचेल अशी माहिती रेल्वे प्रशासंकडून देण्यात आली होती. मात्र रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्ष ते मुळे आणि विलंब कारभारामुळे बस उशिरा पोचली. या प्रचंड विलंबामुळे प्रवाशांचा संयम सुटला आणि संतप्त झालेल्या प्रवाशांनी गाडीतीलच नव्हे तर सोलापूरकडे जाणाऱ्या दुसऱ्याला रेल्वेलाही अडवून धरले.

या घटनेमुळे यवत परिसरात काही काळ तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. या रेल्वे प्रशासनाच्या विलंब कारभारामुळे सामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!