लाडक्या बहिणींना मोठा धक्का ; जिल्हा परिषद निवडणुकीनंतर लाभार्थ्यांची कडक पडताळणी, संख्या घटणार?


पुणे: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.प्राप्तिकर विभागाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला असून, आता लाभार्थ्यांच्या पात्रतेची कडक पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे आता अनेक महिलांची नावे या योजनेतून वगळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींना ३१ डिसेंबरपर्यंत ईकेवायसी करण्याची मुदत सरकारकडून देण्यात आली होती. आता लाडक्या बहि‍णींची पडताळणी केली जात आहे. अपात्र लाडक्या बहि‍णींचे नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे, याबाबत जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. याचा लाडक्या बहिणींना धक्का बसणार आहे.

विशेषतः वार्षिक उत्पन्नाच्या निकषात बसत नसलेल्या लाभार्थ्यांवर आता सरकारकडून कात्री लावली जाणार आहे. जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर या अहवालाची अंमलबजावणी होऊन लाभार्थी संख्या घटण्याची दाट चिन्हे आहेत.

दरम्यान लाडक्या बहिणीने इ केवायसी करून देखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे केवायसी ची लिंक पुन्हा सुरू करावी अशी मागणी देखील बहिणीकडून सरकारला करण्यात आली आहे.प्राप्तीकर विभागाच्या अहवालानुसार अनेक अपात्र महिलांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!