आज होणार फैसला? महापौर कोणाचा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्यासोबत शिंदेंची बैठक….


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आरक्षण पदाची सोडत निश्चित होऊनही अद्याप महापौर पदाचा तिढा सुटलेला नाही. या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे.आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच बैठकीत महापाैर पदासोबतच अनेक पदांवर निर्णय होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोबिंवली या महापालिकांवर युतीचा महापाैर होणार असे भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपद शिंदेंना न दिल्याने महापौरपद देण्यास हरकत नसल्याचा सूर देखील होत आहे. मीरा-भाईंदरमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली सुरू आहेत. आता आजच्या सायंकाळच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई महापालिकांबाबत एकत्रित निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई मनपात शिवसेना (शिंदे गट) ला सन्मानपूर्वक पदे हवी आहेत. शिंदे गटाकडून महत्वाची पदे मागितली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमहापौर, स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती अध्यक्षपदांची शिवसेनेला अपेक्षा असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आजच्या बैठकीत नक्की काय होते, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र या बैठकीत महापौर हा महायुतीचाच होणार असल्याच्या चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!