लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा; येत्या 10 दिवसात जानेवारीचे 1500 खात्यात जमा होणार


पुणे : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणी जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना आता येत्या दहा दिवसात 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. मात्र फेब्रुवारी महिन्यात महिलांना जानेवारी चा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेची निवडणुक 5 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर निकाल 7 तारखेला लागणार आहेत. त्याआधीच महिलांना पैसे मिळणार असल्याची शक्यता आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

गेल्या अनेक महिन्यापासून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करूनही पंधराशे रुपये मिळाले नाहीत. त्या महिलांची आता प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर महिलांना त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!