ब्रेकिंग! आजपासून सलग ४ दिवस बँकांना सुट्ट्या, शाळांचं काय?

पुणे : देशभरातील बँक ग्राहकांसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा अडचणीचा ठरणार आहे.देशातील सर्व बँका आजपासून बंद राहणार आहे. 24 ते 27 जानेवारी असे एकूण 4 दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या व्यवहारावर मोठा परिणाम होणार आहे.

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी 27 जानेवारी 2026 रोजी एक दिवसीय संपाची घोषणा केली आहे.पाच दिवसाचा कामाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला असून तो झाला तर बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहे.


देशात 24आणि 25 जानेवारीला बँकांना शनिवार-रविवारी सुट्टी असणार आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनामुळे बँक बंद असणार आहे. 27जानेवारीला बँकांचा संप असणार आहे. त्यामुळे सलग 4दिवस बँका बंद असणार आहे.दरम्यान पाच दिवस काम करण्याबाबत निर्णय होत नाहीये, त्यामुळेच बँकांनी संप केला आहे.
बँक बंद असणार असल्या तरीही ऑनलाइन सर्व्हिस सुरु असणार आहे. तुमचे एटीएम, यूपीआय, मोबाईल बँकिंग या सुविधा सुरुच असणार आहेत. या दिवशी चेक क्लिअरन्स, ड्राफ्ट, कॅश काउंटर आणि ब्रँचमध्ये जी कामे होणार आहेत ती होणार नाहीत.
