राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप! उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा महाविकास आघाडीत येणार…


पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी युत्या, आघाड्या दिसल्या. काही ठिकाणी भाजप-शिंदे एकत्र लढले, २० वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधूही एकत्र आले.

काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार बाहेर पडले आणि महायुतीत सामील झाले. मात्र नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्यांनी पुणे, पिंपरीसह अनेक ठिकाणी निवडणूक लढवली.

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे आता माहाविकास आघाडीत दिसणार नाहीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने तुमच्यासोबत नसतील का असा सावल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. मात्र त्यावर थेट उत्तर न देता संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक वेगळाच बॉम्ब फोडला. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा का विचार करत नाही ? असा उलट सवालच राऊतांनी विचारला.

भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील. अजित पवार त्यांच्या पक्षासह आज शरद पवारांसोबत युती करत आहेत. त्यांचं मन कुटुंबाकडे आहे. त्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत येईल असं भाकित राऊत यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.

या पएकंदर मुद्यावर राऊत सविस्तर बोलले. शरद पवार बाहेर पडणार असा का विचार करता. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा का विचार करत नाही ? कारण शरद पवार हे आमच्यासोबत आहेत. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. अजित पवार यांचा पक्ष युतीत आहे. तरीही महाविकास आघाडीसोबत पाट लावला आहे.

अशावेळी त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, असं राऊत म्हणाले. आमच्या माहितीनुसार, भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित महाविकास आघाडीत दिसतील. अजितदादांना बाहेर पडावं लागेल. दोन दगडावर पाय कसे ठेवणार? काही तरी एक सोडावं लागेल ना? असंही राऊत म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!