महापौर पदावरून सस्पेन्स…?मुंबईत रात्रीच्या बैठकीत उलथापालथ, ‘या’ कारणामुळे निवडीची प्रक्रिया लांबणीवर जाणार…


मुंबई : सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या महापौर निवडीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे आरक्षण सोडत होऊनही महापौर पदासाठी महायुतीकडून कोणत्याही हालचाली नाहीत. आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटांच्या वरिष्ठ नेत्यामध्ये झालेल्या बैठकीतून महापौर निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे

महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अद्याप एकमत न झाल्याने आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ३१ जानेवारी रोजी होणारी महापौर निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ‘खुला प्रवर्ग’ (महिला) जाहीर झाला आहे. मात्र आता महापौर निवडणूक तात्पुरती पुढे ढकलण्यावर रात्रीच्या बैठकीत नेत्यामध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिकेत सध्या भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ असे एकूण ११८ नगरसेवक महायुतीकडे आहेत. नियमानुसार बहुमतासाठी लागणारा आकडा महायुतीकडे असला तरी सत्तास्थापनेवरून दोन्ही पक्षात मतभेद आहेत. महापौर पदाच्या निवडीवर अजूनही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाही.

तसेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्याप आपली अधिकृत गटनोंदणी केलेली नाही. महापौर पदाच्या निवडीसाठी ही नोंदणी अनिवार्य असते. असं असूनही अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. या महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ३१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महापौरपदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. मात्र, रात्री उशिरा वरिष्ठ पातळीवर झालेल्या राजकीय खलबतांनंतर ही निवडणूक नियोजित तारखेला न घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे महापौर निवडीचा सस्पेसं आणखीन वाढला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!